या शैक्षणिक वर्षांपासून शालेय पोषण आहार पोर्टल म्हणजेच MDM पोर्टल सुरु करण्यात आलेले आहे.हे पोर्टल सुरु झाले तेंव्हा सुरुवातीला सर्व शाळांना त्यामध्ये आपल्या शाळेत असलेला मागील शैक्षणिक वर्षांचा म्हणजेच दिनांक 1 जून 2016 चा शिल्लक धान्य व धान्यादी माल (शिल्लक साठा) नोंद करण्याची सूचना दिली गेली होती.सर्व शाळांनी या मध्ये नोंद देखील केलेली आहे.परंतु त्या वेळी काही शाळांची opening balance माहिती भरताना चूक देखील झाली असल्याचे निदर्शनास आलेले आहे.
✏तसेच सर्व शाळा दररोज शालेय पोषण आहार लाभार्थी दैनंदिन माहिती म्हणजेच daily attendance भरत आहेत.हे भरत असताना काही शाळाकडून मागील काही दिवसांची माहिती भरावयाची राहून गेलेली आहे किंवा माहिती भरली परंतु चुकलेली आहे.
✏अशा चुकांमुळे त्या शाळेच्या आपल्या पोषण आहार नोंद वही मध्ये असलेला सध्याचा शिल्लक साठा आणि MDM पोर्टल ला system कडून तयार ऑटो जनरेट झालेला शिल्लक साठा यामध्ये ताळमेळ बसत नाही म्हणजेच तफावत आढळून येत आहे असे लक्षात आले आहे.त्यामुळे आपल्याकडे नेमके किती धान्य शिल्लक आहे हे समजणे कठीण होत आहे.
✏यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून पुढील महत्वाची सूचना सर्व पोषण आहार लाभार्थी शाळांना देण्यात येत आहे.
✏ सर्व शाळांनी दिनांक 22/12/2016 ते 31/12/2016 या मुदतीमध्ये आपल्या शाळांमध्ये दिनांक 30 नोव्हेंबर 2016 रोजी असलेला प्रत्यक्ष शिल्लक साठा (नोंद वहीमध्ये नोंद असलेला धान्य व धान्यादी माल) आपल्या शाळेच्या MDM पोर्टल ला नव्याने नोंद करावयाचा आहे. हे करत असताना आपल्या या वेळी कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही याची काटेकोरपणे मुख्याध्यापकाने नोंद घ्यायची आहे.चुकलेल्या माहितीमुळे भविष्यात काही समस्या निर्माण झाल्यास संबंधितास जबाबदार धरण्यात येणार आहे.
✏सदर माहिती अचूक भरल्यानंतर आपल्या शाळेतील शिल्लक मालाची प्रत्यक्ष स्थिती वरिष्ठ कार्यालयास समजून येणार आहे.यामुळे कोणत्या शाळेला धान्य व धान्यादी मालाची आवश्यकता आहे हे समजून येणार आहे.आजपर्यंत मुख्याध्यापक स्वतः धान्य व धान्यादी मालाची मागणी देत होते ते या प्रक्रियेनंतर संपुष्टात येणार आहे.
✏ तसेच आपल्या शाळेची धान्य मागणी ही system द्वारे जनरेट केली जाऊन पुरवठादारास कळवली जाणार आहे.यामुळे पोषण आहार शाळेस वेळेत पोहचण्यासाठी होणारा विलंब यापुढे होणार नाही हे लक्षात घ्यावे.
✏ तसेच पुढील शैक्षणिक वर्षात शाळेत रोजच्या रोज घेतली जाणारी नोंदवही मधील नोंद देखील बंद करण्यात येण्याच्या दृष्टीने ही माहिती काळजीपूर्वक भरणे महत्वाचे ठरणार आहे.
✏ दिनांक 30 नोव्हेंबर 2016 चा शिल्लक साठा MDM पोर्टल ला कसा भरायचा याबाबत सविस्तर सूचना आपणास उद्याच्या पोस्ट मध्ये देण्यात येतील.
✏ या सुचनेनंतर सर्व शाळांनी आपल्या शाळेत असलेला इयत्ता 1 ते 5 आणि इयत्ता 6 ते 8 या वर्गांचा दिनांक 30/11/2016 चा शिल्लक साठा वेगवेगळा काढुन ठेवावा.म्हणजे दिलेल्या मुदतीत ही माहिती भरताना विलंब होणार नाही.ही माहिती भरण्यासाठीच्या मुदतीमध्ये कोणत्याही स्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी अशा सूचना या पोस्ट द्वारे देण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment